*विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पास*

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने यावर्षी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विशाल मैदानावर २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ६ दिवसीय ” कल्पतरू फन फेस्ट २०२४ ” चे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात सायंकाळी ७ ते रात्रौ ११ वाजताच्या दरम्यान मनोरंजनासोबत विविध वस्तू आणि खाद्य पदार्थांची रेलचेल राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा देण्यात येणार आहे. ६ दिवसीय उत्सवात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन कल्पतरू सोशल क्लबचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केले. स्थानीय बाबुलाल फुड प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या उत्सवाचे उद्घाटन २ फेब्रुवारीला आनंदवनातील मूक बधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तालुका क्रिडा संकुलाच्या १ लाख ५० हजार वर्ग फुटात हा भव्य उत्सव आयोजित केलेला आहे. सर्वांसाठी सर्व काही म्हणून उत्सवात विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी या मनोरंजन उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. अशी माहिती पदाधिकारी यांनी दिली. पत्रकार परिषदेत कल्पतरूचे पदाधिकारी राजू महाजन, शशीकांत चौधरी, सोनू मालू, तरूण बैद, दर्शन मालू, हुजेफा अली उपस्थित होते.
*दिल्ली येथील ” बाहुबली हनुमान ” यांची भव्य शोभायात्रा*
तालुका क्रीडा संकुलात २ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या ६ दिवसीय उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. फन फेस्ट उद्घाटनापूर्वी २ फेब्रुवारीला दुपारी ३.०० वाजता महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत दिल्ली येथील सुप्रसिध्द १० फुट उंचीचे ” बाहुबली हनुमानजी ” यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
*फुड जोन मध्ये विविध राज्यांतील स्टॉल*
विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा याकरिता फुड जोनमध्ये स्टॉलसाठी जागा चिन्हित करण्यात आली आहे. स्टॉलमध्ये पंजाबी, राजस्थानी, वऱ्हाडी, इटालियन, चायनीज, आईस्क्रीम, मॉकटेलस इ. दी प्रसिद्ध व्यजनाची मेजवानीचा लाभ घेता येईल.
*विशाल प्रदर्शनी आयोजित*
उत्सवात सहभागी दर्शकासाठी विविध नामांकित चारचाकी व दुचाकी वाहन कंपन्यांचे स्टॉल, सोबतच विशाल प्रदर्शनी चे आयोजन करण्यात येणार आहे.

*विविध प्रकारचे झुले देणार आनंद*
सर्वांना आकर्षित करण्यासाठी देशाच्या विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारचे झुले उत्सवात सहभागी होणार आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी टोराटोरा, ड्रॅगन,चांदतारा, गगनचुंबी झुले अदीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

Previous articleवरोरा व भद्रावती येथे फार्मासिस्ट करीता एक दिवसीय रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन