Home क्राईम *भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार खटके यांना एक दिवसाची पोलीस कोठडी*

*भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार खटके यांना एक दिवसाची पोलीस कोठडी*

146
*चंद्रपूर* : माती उत्खनन व वाहतूक करण्याचा परवान्यासाठी २५ हजार रूपयांची मागणी करणाऱ्या जिल्हयातील भद्रावती येथील तहसीलदार नीलेश निवृत्ती खटके, (वय ३६ वर्षे) यांना लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने काल रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला. आज जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी तहसीलदार खटके यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
भद्रावती तहसील अंतर्गत चिरादेवी पो. सुठाना येथील रहिवासी तक्रारदार यांचा वीटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वमालकीच्या शेतीतून ३०० ब्रास माती उत्खननासाठी रायल्टीसाठी ८८,२५६ रुपयांचा भरणा केला. ऑन लाईन पावती घेऊन तक्रारदार भद्रावती तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार खटके यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. आणि काल शनिवारी तहसीलदार खटके यांना २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. आज जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या न्यायालयाकडे एक दिवसाची पोलीस कोठडीची केलेली मागणी मान्य करून न्यायालयाने तहसीलदार खटके यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात सरकारी वकील अॅड. गोविंद उराडे यांनी पैरवी केली.
Previous articleओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे सेंटर भद्रावती तर्फे भव्य कबड्डी सामने व भव्य रक्तदान शिबिर ।
Next article*जनसेवेचे उत्तरदायित्व आजन्म निभावणार* – *नगराध्यक्ष अहेतेशाम अली*