Home चंद्रपूर  लोकशिक्षण संस्थेतर्फे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात नव्या शैक्षणिक धोरणावर परिसंवादाचे आयोजन*

लोकशिक्षण संस्थेतर्फे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात नव्या शैक्षणिक धोरणावर परिसंवादाचे आयोजन*

121
*६ मार्च रोजी आयोजित मेळाव्याचा लाभ घ्यावा*
– *लोकमान्य माजी विद्यार्थी संस्था*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : लोकशिक्षण संस्था, वरोडाद्वारा संचालित शाळा व महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या लोकमान्य माजी विद्यार्थी संस्थेतर्फे येत्या ६ मार्च २०२२ रोजी संस्थेच्या आवारातच माजी विद्यार्थ्यांच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० या कालावधीत करण्यात आल्याची माहिती देत संबंधित विद्यार्थ्यांनी त्यात हिरीरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्णा घड्याळपाटील यांनी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
याविषयी अधिक माहिती देतांना श्रीकृष्णा घड्याळपाटील म्हणाले की, लोकशिक्षण संस्थेची स्थापना सन १९५२ ची असून आजतागायत लाखों माजी विद्यार्थी येथील संस्कारांचा लाभ घेऊन बाहेर पडल्यावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, पत्रकार, उद्योजक, अधिकारी, क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
सकाळी ९.३० ते ११.३०, ११.३० ते १.००, दुपारी १.४५ ते ४.०० अशा तीन सत्रात आयोजित या मेळाव्यात उद्घाटन सोहळा, माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. तसेच मागील वर्षापासून या संस्थेने सुरू केलेल्या ‘ लोकमानस ‘ या त्रैमासिकांच्या नूतन अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात ‘ नवे शैक्षणिक धोरण आणि शाळांपुढील आव्हाने ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. याखेरीज माजी विद्यार्थ्यांची मनोगते, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माजी विद्यार्थी विविध उपक्रम राबवितात, निधी संकलन करतात. अशाच उपक्रमातून तत्कालीन शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी निधी संकलित करून तीन वेगवेगळे प्रकल्प तयार केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या मेळाव्यासाठी जवळपास ३०० विद्यार्थी सहभागी होतील, असे माजी विद्यार्थी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रा.राधा सवाने यांनी सांगितले. सहयोग राशी, माजी विद्यार्थी सभासद शुल्क ५०० रूपये निश्चित करण्यात आले असले तरी जे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी इच्छुक असून शुल्क भरण्यास असमर्थ आहे त्यांनी निराशा टाळण्यासाठी कमेटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
पत्रपरिषदेत लोकशिक्षण संस्था, कार्यवाहक श्रीकृष्णा घड्याळपाटील, माजी विद्यार्थी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रा. राधा सशाने, सचिव अनिल नानोटकर, प्रा. रवींद्र शेंडे, आस्थापनेतील मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Previous articleकेपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थानात भाकपाचे आंदोलन
Next article*पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा*