Home चंद्रपूर  १८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

१८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

31

*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, शाखा वरोरा यांच्या वतीने आयोजन*

*वरोरा* : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा यांच्या वतीने सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी वरोरा रेल्वे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या वतीने अध्यक्ष राकेश कुमार यांनी सांगितले की, ‘रक्तदान, महादान ‘ आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कुणाचाही जीव जाणार नाही, या उद्देशाने वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.०० वाजता होणार असून शिबिर सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी इच्छुकांनी संघाशी संपर्क साधावा. शिबिराच्या यशस्वितेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, कार्याध्यक्ष विनोद कुमार, सचिव बी.के. भुयान, कोषाध्यक्ष आशिष हरणे आदींनी केले आहे.

Previous articleरेल्वे प्रवासी संघातर्फे बल्लारशाह एक्सप्रेसचे हर्षोल्लासात स्वागत
Next articleभाजपा के लोकसभा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार का जंगी स्वागत.