Home चंद्रपूर  नगरपरिषद विज कर्मचाऱ्यांना पुरेसे सुरक्षा साहित्य द्या.

नगरपरिषद विज कर्मचाऱ्यांना पुरेसे सुरक्षा साहित्य द्या.

96

भाकपा चे मुख्याधिकारी यांना निवेदन.
भद्रावती –
शहरातील पथ दिवे लावणे आणि त्याची दुरुस्ती देखभाल करणे या कामासाठी कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांना सुरक्षा साहित्य पुरेशा प्रमाणात न पुरवल्याने काम करताना त्यांच्या जीवितास धोका आहे त्यांना सुरक्षा साहित्य पूरवा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी केली आहे.
या मागण्याचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना दिले शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकरिता कंत्राटी पद्धतीने काम केल्या जाते या कामाकरिता सात कर्मचारी कार्यरत आहे खांबावर चढून तसे जिवंत तारांच्या संपर्कात राहून हे काम करावे लागते चुकून अनर्थ घडू नये याकरता त्यांना सुरक्षा साहित्य तात्काळ पुरवण्यात यावे जेणेकरून ते स्वतः सुरक्षित अंतर ठेवून काम करू शकेल यात शिडी , हॅन्ड ग्लोज, जूता, हेल्मेट यासह इतर साहित्याचा समावेश आहे. तसेच पथ दिव्याचे लोखंडी खांब जिर्ण झाले आहे तर काही खांबांना स्टे नसल्याने ते एका बाजूने झुकले आहे. अशा खांबाची महावितरण कंपनीने दुरूस्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे.

Previous article*आयपीएल टी- २० मॅचमध्ये सट्टा लावणारे ९ सट्टेबाज गजाआड ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त*
Next article*वरोरा विद्युत वितरणचे सहायक अभियंता चुक्का एसीबीच्या जाळ्यात*