Home चंद्रपूर  *आनंद निकेतन महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

*आनंद निकेतन महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

112
*महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* – आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा येथे एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत ‘ महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ‘ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते.
मंचावर उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, पर्यवेक्षक प्रा. उषा गालकर आदींची उपस्थिती होती .
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. काळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनाच्या स्पर्धेत प्रयत्न करीत असताना जीवनात जे काही चांगले आहे त्याचीच निवड केली पाहिजे.
महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धकांनी आपली मते प्रभावीपणे मांडली.
या स्पर्धेत गौरव सरमुकादम यांनी प्रथम क्रमांक तर अमित दातारकर व मयूर हनवते यांनी क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. स्नेहल पिदुरकर कु.मोनिका हजारे आणि कु.आस्था अवघडे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मानसी काळे, प्रा. निलेश जोशी यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. रमेश पवार आणि डॉ.प्रवीण मुधोळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन हर्षा देठे हिने केले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Previous article*पंचकर्माद्वारे शरीराचे शोधन आणि संरक्षण करणे शक्य* – *डॉ. डिंपल घुबडे मोटघरे*
Next article*पालकत्व स्वीकारुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास*