Home चंद्रपूर  *बेलदार समाज संघटनेची वरोरा शहर कार्यकारिणी गठित*

*बेलदार समाज संघटनेची वरोरा शहर कार्यकारिणी गठित*

75

बेलदार समाज संघटना, शाखा वरोरा यांची बैठक नुकतीच पवनसुत देवस्थान येथे दिनकरराव पारेलवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये सर्वानुमते सन २०२३ ते २०२५ या कालावधीकरिता वरोरा शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली. समाजाच्या वरोरा शहर अध्यक्षपदी दिलीप गिदेवार यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी कार्याध्यक्ष राजू फेथफुलवार, उपाध्यक्ष शंकर पारेलवार, अजय बालमवार, सचिव संजय जिलगिरवार, सहसचिव राहुल दागमवार, कोषाध्यक्ष अशोक बोमरतवार, सहकोषाध्यक्ष अमोल ताटेवार तसेच सल्लागार समिति प्रमुख सुभाष देशट्टीवार, संजय गुंतीवार, राजू जिलगीलवार, मनोज मदिकुंटावार, अजय वदनलवार तर सदस्य म्हणून दीपक पारेलवार, प्रज्वल कोलतेवार, पराग सूंकरवार, मनोज पोगुलवार, विलास पारेलवार, संतोष गुंतीवार, समीर पुंजरवार, सचिन बोमरतवार, नितिन देबटवार,श्रीकांत ताटेवार, गजानन वदनलवार यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष गुंतीवार अशोकराव बोम्रतवार उपस्थित होते.

Previous articleकार और बाइक की टक्कर में एक की मौत।
Next article*आनंदवनात २४ ऑक्टोंबर पासून तीन दिवसीय विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*