Home चंद्रपूर  *जुनी पेन्शन योजनेसाठीच्या राज्यव्यापी संपात सहभागी नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेशरमाचे फुल समर्पित*

*जुनी पेन्शन योजनेसाठीच्या राज्यव्यापी संपात सहभागी नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेशरमाचे फुल समर्पित*

50

*तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा उत्साह कायम*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन सुरू होण्यासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने केली. संपाचा आरोग्य सेवेसह इतर कार्यालयातही परिणाम जाणवला. आपल्या निहित स्वार्थासाठी असहकार दर्शवून आज तिसऱ्या दिवशीच्या संपात सहभागी न होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील संपकऱ्यांतर्फे बेशरमाचे फुल समर्पित करण्यात आले.
०१ नोव्हेंबर,२००५ व त्यानंतर नियुक्त शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटने सह विविध संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी १४ मार्च २३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे व जोरदार निदर्शने करीत सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर, २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निम सरकारी इ.सर्व कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना (एन.पी. एस.) रद्द करून जुनी पेन्शन योजना ( महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ व नियम १९८४ ) पुन्हा पूर्ववत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी दि.१४ मार्च २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या संपात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संबंधित कर्मचारी/अधिकारी यात सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे सरकारी कामकाज जवळपास ठप्प झाले असून विविध शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. या तीन दिवसांत आपल्या कामासाठी विविध कार्यालयांत येणाऱ्या जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात संपात परिचारिका आणि तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचारीही सहभागी झाले असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची प्रकृती बिघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या. अपवाद वगळता विविध शस्त्रक्रिया ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी असल्याने शवविच्छेदनाचा पेच निर्माण झाला आहे.
संपात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. परंतु काही यात अपवाद ठरले. यात ” मला काय त्याचे?” म्हणत संपाकडे पाठ फिरविणाऱ्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत “अशा चुका करू नका,”असे सांगून त्यांना बेशरमाचे फुल समर्पित करण्यात आले.

Previous articleवणी-वरोरा हाइवे यातायात के लिए 12 घण्टे रहेगा बन्द.
Next articleक्रांतिकारी शहीद शेडमाके की जयंती मनाई ।