Home चंद्रपूर  *वरोरा नगर परिषदेच्या स्थापना दिनी ७५ फुट उंच ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा*

*वरोरा नगर परिषदेच्या स्थापना दिनी ७५ फुट उंच ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा*

52

*नगर परिषदेचा १५७ वा स्थापना दिवस थाटात साजरा*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* :- नगर परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वरोरा नाका चौक परिसरात ७५ फुट उंच ध्वजस्तंभावर सतत डौलाने फडकत राहणारा राष्ट्रध्वज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते फडकवून वरोरा नगर परिषदेचा १५७ वा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त नगर परिषद सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भापोसे), संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार निधीतून नगर परिषदेला देण्यात आलेल्या शववाहिका व अंबुलन्सचे आमदारांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. तदनंतर उत्कृष्ट सेवा प्रदान करणाऱ्या न.प. कर्मचाऱ्यांचा तथा जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत पीएम फारमलायजेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजनांतर्गत मंजूर झालेल्या मंजूरी पत्राचे वितरण व बचत गटांना मंजूर झालेल्या कर्ज रक्कमेचा धनादेशाचे वितरण करण्यात आले.
वरोरा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. इतर मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून नगर परिषदेच्या १५७ व्या स्थापना दिनानिमित्त गौरवोद्गार काढले.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी तथा प्रशासक गजानन भोयर यांनी नगर परिषदेच्या इतिहासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रकल्प अधिकारी उमेश कथडे यांनी केले तर आभार निलेश सरागे यांनी मानले.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, नगर परिषद कर्मचारी वृंदाची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर विभाग प्रमुख गजानन आत्राम व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous article*वरोरा न.प. क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन भाजपचा एल्गार ; मुख्याधिकारी यांना निवेदन दिले*
Next articleवेकोलि कर्मचारियों के जान से खिलवाड़ कर रहा प्रबंधन।।