Home चंद्रपूर  भद्रावती तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या पोडे

भद्रावती तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या पोडे

21

माजरी – प्रतिनिधी 

माजरी – येथील सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस पक्षाच्या कर्तबगार व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेल्या संध्या पोडे यांची त्यांच्या कार्याची दखल घेत भद्रावती तालुका महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याचे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष (ग्रामीण ) नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी संध्या पोडे यांच्या निवडीचे पत्र देवून भद्रावती तालुका महिला काँग्रेस अध्यक्षाची घोषणा केली.
संध्या पोडे यांना माजरी वस्ती येथील ग्रामस्थांनी २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. दरम्यान संध्या पोडे ग्रामपंचायत सदस्य पदावर असताना गावातील समस्या सोडविण्यात नेहमी अग्रेसर होत्या.
काँग्रेसचा विचार पोडे कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून रुजला आहे. राजकारणात सत्ता आल्या, गेल्या मात्र संध्या पोडे यांचे सासरे शामसुंदर पोडे हे कायम काँग्रेसच्या विचारांशी बांधील राहिले. काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे.
तालुक्यात प्रत्येक गावात संघटन मजबूत करण्यावर भर राहील असे मत संध्या पोडे यांनी व्यक्त केले. संध्या पोडे यांना जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी भद्रावती तालुका अध्यक्षपद बहाल केल्यामुळे सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संध्या पोडे आपल्या निवडीचे श्रेय वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिले.

Previous articleभाजपा के लोकसभा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार का जंगी स्वागत.
Next articleचंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रों के संपूर्ण मंदिरो में एकसाथ पूजा.