Home चंद्रपूर  जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे मजरा (खु.) येथे वृक्षारोपण कार्यक्रम.

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे मजरा (खु.) येथे वृक्षारोपण कार्यक्रम.

47

*मामा तलाव परिसरात ८०० रोपांची लागवड*

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संर‌क्षणासाठी मजरा (खुर्द) गावातील मामा तलाव परिसरातील चार एकर बंजर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी जीएमआर कंपनीचे सीओओ (थर्मल) – धनंजय देशपांडे, अधिकारी विनोद पुसदकर, आकाश सक्सेना, प्रवीण शेट्टी, इब्राहिम शेख, मजरा (बु.) येथील सरपंच वंदना निब्रड आदी उपस्थित होते .
वृक्षारोपण कार्यक्रमात फणस, आंबा, कडुलिंब, पिंपळ याव्यतिरिक्त फळझाडे, पर्यावरण पूरक व सावली देणारी झाडे, निवडून विविध वृक्षाच्या रोपांची लागवड करुन वृक्षांना जगविण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे ९० हून अधिक कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सामाजिक व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडत, वृक्ष लागवडीच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. या सर्व मान्यवरांनी प्रत्यक्ष उपक्रमात सहभाग घेतला व ग्रामस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले. सर्वांनी मिळून जवळपास ८०० हून अधिक वृक्षाचे रोपण केले.
वृक्षाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कंपनी ( GWEL) मार्फत वृक्षारोपणा भोवती कुंपण घालण्यात आले असून लावलेल्या झाडाचे रक्षण संरक्षण करून वृक्षांना जगविण्याचा संकल्प करीत पाणी वृक्षांना नियमितपणे पाणी मिळावे यादृष्टीने पाणीपुरवठ्यासाठी हातपंप देखील बसविण्यात आले आहेत. यावेळी ग्रामपंचायतीने संमती देऊन लावलेली झाडे वाचवण्याची शपथ घेतली आणि भविष्यात झाडामुळे निर्माण होणारी हिरवाईचा विचार करून कंपनीचे (GWEL) भरभरून कौतुक केले.
कंपनीचे सीओओ धनंजय देशपांडे यांनी उचित सहकार्यासाठी ग्राम पंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करीत सर्वांच्या सहकार्याने पुढील टप्प्यात गावपरिसरात २००० वृक्षाचे रोपण करून हा परिसर संपूर्ण हिरवागार करण्यासाठी जीएमआर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संकल्प केला असल्याचे सांगून या परिसरात फळझाडे लावून संगोपन केल्यास परिसरातील ग्रामस्थांना व त्यांच्या कुटुंबीयांना फळ उपलब्ध होतील व हा परिसर भविष्यात कौटुंबिक एकत्रिकरण करता उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती सदस्य, ग्रामसंघ मजरा खुर्द बचत गटाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous articleगणेशोत्सव, ईद साजरी करताना ‘ जोश ‘ आणि ‘ होश ‘ यांचे तारतम्य बाळगावे – रवींद्रसिंह परदेशी.
Next articleशेगांव ठाण्यातील पोलीस कर्मचारी डुकरे यांची अखेर बदली