Home चंद्रपूर  बेरोजगार, गरजूंनी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.* – *रमेश राजूरकर*

बेरोजगार, गरजूंनी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.* – *रमेश राजूरकर*

86
*वरोरा* : मागील काही दिवसात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना रोजगाराच्या संधीबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था, वरोरा तसेच संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन १ मे रोजी सकाळी १० वाजता स्थानिक सिद्धीविनायक मंगल कार्यालय (पोलीस स्टेशन समोर) खांजी वार्ड, वरोरा येथे रोजगार व स्वंयरोजगार मेळावा, इमारत बांधकाम कामगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार गरजूंनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूरकर यांनी केले. स्थानीक रॉयल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंचावर संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल कुमरे उपस्थित होते.
अधिक माहिती देतांना राजूरकर म्हणाले की, मेळाव्याचे उद्घाटन स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरेबल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे करणार आहे. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाचे कार्यकारी अभियंता अमिताभ पावडे, गवंडी बांधकाम मजदूर युनियनचे अध्यक्ष प्रशांत रामटेके, जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोराचे अध्यक्ष तसेच रुलर चेंबर ऑफ काॅमर्स इंडियाचे उपाध्यक्ष रमेश राजूरकर मार्गदर्शन करणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सीएसी महा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष पांडुरंग गावंडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश मेश्राम, माजी उपसभापती तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा कुंभारे, भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांची उपस्थिती राहणार आहे.
मेळावा तसेच मार्गदर्शन शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती जयगुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, उपाध्यक्ष मुकूल राजूरकर, सचिव पुरुषोत्तम नन्नावरे, सल्लागार माया राजुरकर यांच्यासह सदस्य आदित्य राजूरकर, गजानन माटे, विजयडवरे, प्रफुल हुसूकले, मनोज देऊळकर, पांडूरंग नागदेवते, आशिष गेडाम, विवेक शास्त्रकार, विकास ठेंगणे, सौरभ पिंपळशेंडे, यादव उइके, संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमरे, सचिव प्रफुल किन्नाके, उपाध्यक्ष यशोदा येटे, मिनाक्षी किन्नाके, राहूल मेश्राम, रमेश मडावी, दुर्गा खनके, वैशाली ठाकरे आदींनी केले आहे.
—-
Previous article*आनंदवनात कर्णबधिरांसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न*
Next article*शहरातील वाहतुकीत खोळंबा होणाऱ्या आनंदवन चौक व डॉ. कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा* – *विलास टिपले*