Home बड़ी खबरें *CRIME‼️ BREAKING*‼️ *यवतमाळ जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या दोन खुनांच्या घटनांनी जिल्हा गेला...

*CRIME‼️ BREAKING*‼️ *यवतमाळ जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या दोन खुनांच्या घटनांनी जिल्हा गेला हादरून*

270
यवतमाळ-आर्णी : पूर्ववैमनस्यातून डोक्यावर दगड टाकून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदणी येथे मंगळवारी (ता. एक) दुपारी चार वाजताच्यादरम्यान घडली. तर प्रेमप्रकरणाच्या संशयातून बाप-लेकाने तरुणाचा खून केला ही घटना आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे घडली.
सुभाष काशीराम अंजीकर (वय ३६, रा. गोदणी) असे मृताचे नाव आहे. दुपारी तरुण गावातील चिंचेच्या झाडाखाली बसून असताना संशयित सचिन वाघमारे (वय २६, रा. गोदणी) याने डोक्यावर दगडाने प्रहार केला. रक्तबंबाळ अवस्थेत सुभाष कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस पाटील मंगेश मानकर यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा नोंद झालेला नव्हता.
आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे शेख समीर शेख छोटू (वय २०, रा. अंतरगाव) याचा खून करण्यात आला. प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यावर व छातीवर मारहाण करून खून केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी मृताचा भाऊ शेख अमिन शेख छोटू (वय २२, रा. अंतरगाव) याने आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पवन विजय राठोड (वय २१) व विजय परसराम राठोड (वय ४५, दोघेही रा. अंतरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून मंगळवारी आरोपींना अटक करण्यात आली.
*‘एसडीपीओं’ची घटनास्थळी दाखल*
प्रेमाच्या संशयातून तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अंतरगाव येथील घटनास्थळासह पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. पुढील कारवाईसंदर्भात पोलिसांना निर्देशही दिलेत.
Previous article10वीं के बाद 12वीं की परीक्षा भी रद्द:इस साल CBSE और ISC के 12वीं के एग्जाम नहीं होंगे।।
Next articleकुचना -थोराना गट ग्राम पंचायत में कोविड टीकाकरण।।