Home चंद्रपूर  *डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य* — *रोटरियन हिरालाल बघेले*

*डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य* — *रोटरियन हिरालाल बघेले*

78

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : कोरोनासारख्या महामारीने मानवाचे अस्तित्व धोक्यात आले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देवदूताची भूमिका साकारून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी येथे व्यक्त केले. रोटरी क्लबच्या नव्या कार्यकारणी तर्फे स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोव्हीड -१९ ला न डगमगता जनतेच्या स्वास्थाचं रक्षण करणाऱ्या जिगरबाज डॉक्टरांना ‘ कोरोनायोद्धा सन्मानपत्र ‘ देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंकुश राठोड हे होते. व्यासपीठावर डॉ. सागर वझे, डॉ. विनोद तेला, रोटरी क्लब ऑफ वरोरा सचिव बंडू देऊळकर, डॉ. निखिल लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. रोटरीयन बघेले पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारी आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय या ध्येयवादी डॉक्टराच्या सन्मानार्थ १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. महान चिकित्सक भारतरत्न बिधान चंद्र रॉय यांचा सन्मान आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी केंद्र सरकारने १९९१ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
रोटरीयन बंडू देऊळकर म्हणाले की, डॉ. बिधान चंद्र रॉय यांची गणना देशातील महान चिकित्सकांत केली जाते. त्यांची जंयती व पुण्यतिथी एकाच तारखेला असल्याचे नमूद करीत त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन देशात सर्वत्र हा दिवस साजरा होतो,असे ते म्हणाले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अंकुश राठोड म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. रोटरी क्लबच्या पुढाकारातून राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मंजूळकर, डॉ. रमेश जाजू, डॉ.निशी सैनानी, डॉ. प्रदीप पराते, डॉ. विजय चांडक,डॉ. संतोष मुळेवार, डॉ. हेमंत खापने, डॉ.सागर वझे, डॉ. विवेक तेला, डॉ. मीना पराते, डॉ. शोभा चांडक, डॉ. हेमलता खापने, डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. राहुल धांडे, डॉ. विशाल हिवरकर, डॉ. अमोल हजारे, डॉ. जगदीश वैद्य, डॉ. मेहरदीप हटवार, डॉ. प्रवीण विश्वंभर , डॉ.शेख, डॉ.आशिष चवले आदींना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीयन सचिन जीवतोडे यांनी केले. सूत्रसंचालन रोटरीयन पराग पत्तीवार यांनी केले. आभार रोटरीयन नितेश जयस्वाल यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीयन सर्वश्री समीर बारई, होजैफ अली, जितेंद्र मत्ते, विनोद नंदूरकर, अमित नाहर, अमित लाहोटी, राम लोया, विजय पावडे, धनंजय पिसाळ, योगेश डोंगरवार, आशिष ठाकरे, पवन बुजाडे, विशाल जाजू, दामोदर भासपाले, आयचित, अमोल मुथा,विनोद जानवेनी योगदान दिले.

Previous article*लोकसहभागातून हत्तीरोग हद्दपार करणे शक्य* – *आमदार प्रतिभा धानोरकर*
Next articleएकोना विस्तारीकरण से प्रकल्पग्रस्त किसानों को तत्काल मुआवजा व नौकरी दी जाए – हंसराज अहीर