Home क्राईम देशी दारूसाठा जप्त, दोन आरोपी अटकेत।।

देशी दारूसाठा जप्त, दोन आरोपी अटकेत।।

145
भद्रावती : देऊरवाडा मार्गे भद्रावती कडे दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना भद्रावती पोलिसांनी दोन आरोपी सह दोन लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पहाटे दरम्यान करण्यात आली . यातील शुभम रामदास इंगोले वय 27 , अमोल रामदास इंगोले वय 29 राहणार आंबेडकर चौक वनी असे आरोपीचे नाव असून हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 29 ए झेड 220 या वाहनाने वनी वरून देऊरवाडा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे देऊरवाडा रेल्वे गेट जवळ त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लाख दहा हजाराचा देशी दारू साठा व मुद्देमाल जप्त केला यातील आरोपीला अटक केली असून ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार , केशव चिट गिरे , निकेश टेंगे , हेमराज प्रधान , शशांक बदामवार यांनी केली .
Previous articleमहाराष्ट्र में अनलॉक पर कंफ्यूजन !!
Next articleकोरोना को हराना इन गांवों से सीखिए।।