Home चंद्रपूर  *वरोऱ्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

*वरोऱ्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

78

*वरोरा* : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आनंदवन मित्र मंडळ, वरोर्‍याच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. या निमित्ताने महात्मा गांधी चौकात आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांचे हस्ते मंडळांचे पदाधिकारी डॉ. प्रवीण मुधोळकर, डॉ.वाय.एस. जाधव, बंडू देऊळकर, प्रवीण गंधारे, राहुल देवडे , शाहीद अख्तर, भास्कर गोल्हर, वैभव राजपूत, रवी शिंदे, यश राठोड आदींच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच श्रीनगर सिटी येथील मंडळ कार्यालयात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात ओम राऊत, माजी प्राचार्य बळवंतराव शेलवटकर यांच्या सह ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Previous article*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदित्य जीवनेच्या चमकदार कामगरीने वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*
Next article*सदभावना एकता मंच समाजाला दिशा देणारा ठरणार* – *आ. प्रतिभा धानोरकर*