Home चंद्रपूर  *रिषभ रट्टे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा*

*रिषभ रट्टे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा*

82
*मित्रांनी भेटवस्तू देण्यापेक्षा केले स्वत: रक्तदान*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : रक्तदान करणे ही सामाजिक जबाबदारी आहे , ही संकल्पना तरुणांमध्ये रुजत आहे. ‘ रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ समजल्या जाते. महापुरूषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने शिबिराचे आयोजन करून रक्तदान केले जायचे पण आता तरूणांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प करून या सत्कार्याला हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. काळाची पावले ओळखत आपल्या वाढदिवशी वायफळ खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ता तथा टायगर ग्रुपचे वरोरा शहर अध्यक्ष रिषभ रट्टे यांनी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे मित्रांनी ही भेट वस्तू देण्यापेक्षा स्वत: रक्तदान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता किशोर हेमके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, सनी गुप्ता, मेडिकल टीमचे अधीक्षक संजय गावित प्रामुख्याने उपस्थित होते.
मर्दाने म्हणाले की, सध्या संपूर्ण जगावर कोरोना / ओमिक्रान महामारीचे सावट आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मध्यंतरी गरजू रूग्णांना उपचारादरम्यान रक्त वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावले गेले. याची जाणीव ठेवून टायगर ग्रूपचे वरोरा शहर अध्यक्ष रिषभ रट्टे यांनी पुढाकार घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त स्थानीक अंबादेवी देवस्थान परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. देशातील प्रत्येक तरूणाने अशाच प्रकारे समाजकार्याचा आदर्श पुढे ठेवून कार्य करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी टायगर ग्रुपचे रिषभ रट्टे व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त वरोरा नगर परिषदेत कार्यरत १० सफाई कामगारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले.
शिबिरात २१ युवकांनी रक्तदान केले. वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संकलनासाठी संजय गावित, विक्की भगत, अमोल जिद्देवार यांनी सहकार्य केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, युवासेना जिल्हा उप प्रमुख आलेख रट्टे आदींची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाला चांभारे, मारोती नाते, कृणाल खडसे, प्रितम ठाकरे, अयान शेख, इम्रान शेख, वैभव टिपले इ.नी परिश्रम घेतले.
Previous article*बाबांनी सफाई कामगारांमध्ये परमेश्वर अनुभवला* – *डॉ. विकास आमटे*
Next article*लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांनी विश्वासार्हता, नीतिमत्ता जोपासावी* — *सुधाकर कडू*