*वरोरा* : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, ट्रस्ट अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे वरोरा शहरात आगमन होत आहे. त्यानिमित्ताने भागडे परिवाराच्या वतीने सर्व सेवेकरी व समस्त भाविकांकरिता १५ एप्रिलला सायंकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
१५ एप्रिलला सायंकाळी ५.०० वाजता येथील ज्योतिबा फुले चौकात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. पालखी ज्योतिबा फुले चौक येथून निघून श्रीराम मंदिर, सावरकर चौक या मार्गे स्वामी कृपा निवासस्थानी पोहचेल. तद्नंतर ६.३०. वाजता पालखी पूजन, ७.०० वाजता आरती, ७.०० ते ९ पर्यंत पादुका दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या दर्शन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बाबा भागडे यांनी केले आहे.

Previous article*प्रत्येकाला कोणत्याही अडचणीशिवाय आरोग्य सुविधा मिळावी* – *खासदार बाळू धानोरकर*
Next article*कर्मवीर विद्यालय वरोरा येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २०२३ आयोजित*