Home चंद्रपूर  *कर्मवीर विद्यालय वरोरा येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २०२३ आयोजित*

*कर्मवीर विद्यालय वरोरा येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २०२३ आयोजित*

58

*खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, खेळाडूंना खेळाची मुलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच त्यांना आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा, या उद्देशाने कर्मवीर विद्यालय व एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटर, वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल २०२३ ते १३ मे २०२३ पर्यंत सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत येथील कर्मवीर विद्यालयाच्या मैदानावर ३ वर्षा वरील सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी उन्हाळी क्रीडा व योग प्रशिक्षण शिबिर २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरात मैदानावरील वैयक्तिक, सांघिक खेळ (तायक्वांडो,फेन्सींग, लाठी, कबड्डी, योगा, व्हॉलिबॉल ) सोबत ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पारंपरिक खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे खेळाडूंना अनुभवी व क्रिडा मार्गदर्शक व इंडियन तायक्वांदो कोच यांचे मार्गदर्शन प्रशिक्षकाकडून केले जाणार आहे.
सर्व शिबिरार्थी, प्रशिक्षणार्थींना टी शर्ट व सकाळचा अल्पोहार आयोजकांतर्फे देण्यात येत आहे. इच्छुकांनी १५ एप्रिल पर्यंत आपल्या नावाची करून घ्यावी. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबीराचा जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटरचे सागर कोहळे (प्यारा कमांडो, माजी सैनिक ) सुरेश बोभाटे ( माजी सैनिक ) ऋषी मडावी ( माजी सैनिक ), आदींनी एका प्रसिद्धिपत्रका द्वारे केले आहे.

Previous article*१५ एप्रिलला वरोरा येथे श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा दर्शन सोहळा*
Next articleरेत उत्खनन करते हुए दो पोकलेन मशीन जब्त.