Home चंद्रपूर  *विविध सामाजिक संघटनेतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती सोत्साह साजरी*

*विविध सामाजिक संघटनेतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती सोत्साह साजरी*

122

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : विविध सामाजिक संघटनेतर्फे येथील नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अवुल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम यांची जयंती सोत्साह साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे हे होते. नगर परिषदेचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ता छोटुभाई शेख, गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी रुपलाल कावळे , राष्ट्रवादीचे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, सदभावना एकता मंचाचे गोपाळ गुडधे, वरोरा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कोहपरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कावळे म्हणाले की, एक नावाड्याचा मुलगा, वृत्तपत्र विक्रेता ते डीआरडीओचे महान वैज्ञानिक आणि देशाचे राष्ट्रपती अशी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गमे म्हणाले की, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे अख्खे जीवन नवयुवकांसाठी प्रेरणादायी आहे. स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थीपणा, कर्तव्यपरायणता व देशभक्ती याचे अजोड मिश्रण म्हणजे डॉ. कलामसरांचे जीवन होते. त्यांचे विचार युवापिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे.
छोटुभाई यांच्या पुढाकाराने विविध संघटनेच्या माध्यमातून डॉ. कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे केलेले आयोजन खरंच कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी छोटुभाई शेख, विलास नेरकर, राजेंद्र मर्दाने यांनी डॉ. अब्दुल कलाम याच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गुडधे यांनी केले. आभार अरुण उमरे यांनी मानले.
कार्यक्रमात सह. बॅंकेचे माजी संचालक वसंतराव विधाते, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वश्री दिनेश मोहारे, धनराज आसेकर, गुरूदेव जुमडे, देवडकर गुरुजी, प्रशांत झाडे, प्रवीण गंधारे, माजी सैनिक प्रवीण चिमूरकर, शेख शफी, सतीश चौहान, भूपेश टिपले, सुशील शिरसाट, सुनिल गायकवाड, सुनिल कोल्हे, मिनाज अली, शाहीद मोहसीन कुरेशी, मोहसीन पठाण, कैसर शहा, राजू कश्यप, सचिन मेश्राम व तुषार मर्दाने प्रामुख्याने उपस्थित होते.
मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous article*जीएमआर तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*
Next article*ट्रामा केअर सेंटरच्या लोकार्पणाने शहरी व ग्रामीण जनतेला दिलासा* — *खासदार बाळू धानोरकर*