Home चंद्रपूर  *जीएमआर तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*

*जीएमआर तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*

86

*वरोरा* :- जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन,वरोरा याच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा दान उत्सवाचे औचित्य साधून कंपनीच्या कॅन्टीन प्लांटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जीएमआर वरोरा प्लांट प्रमुख धनंजय देशपांडे, समृद्धी लेडीज क्लबच्या अध्यक्षा मेधा देशपांडे, ओअन्डएम प्रमुख अभय चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील रक्तपेढीचे रक्त संकलन प्रमुख डॉ. अनंत हजारे उपस्थित होते.

उद्घाटनीय भाषणात आ. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, कोव्हीड – १९ या साथीच्या काळात रक्ताच्या जास्त मागणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताची कमतरता निर्माण झालेली आहे. सध्याच्या परिस्थितीत रक्तदानाची मोठी आवश्यकता आहे, त्यामुळे लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले . जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशनच्या सीएसआर उपक्रमांचा गेल्या दहा वर्षांत जवळच्या सभोवतालची गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम राबविले असून त्यामुळे आरोग्य, स्वच्छता , शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि उपजीविका क्षेत्रात लक्षणीय बदल झालेले दिसून येतात. याचे श्रेय जीएमआर कंपनीस जाते असे त्या म्हणाल्या. कंपनीच्या वतीने १७ गावामध्ये १ वॉटर एटीएम प्लांट बसवून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने गावातील लोकांचे पाण्यामुळे होणाऱ्या साथीचे रोग प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीड – १९ च्या संक्रमण काळात जीएमआर कंपनीने विविध उपक्रमांद्वारे सरकारी रुग्णालयात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
धनंजय देशपांडे यांनी सांगितले की, कंपनी तर्फे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दान उत्सव साजरा करण्यात येतो. कंपनीचे कर्मचारी आसपासच्या गावातील विद्यार्थी व गरजू व्यक्तीसाठी व त्यांच्या कल्याणासाठी यथोचित योगदान देतात. रक्तदान शिबिर त्यातलाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित केली जातात. त्यांनी सीएसआर उपक्रमांची माहिती दिली आणि समाजाच्या कल्याणाकरिता स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून दोन्हीच्या सहयोगाने विकासात्मक काम करण्यात येईल, असेही नमूद केले.
डॉ.अनंत हजारे यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले. तसेच कोव्हीड परिस्थितीत रक्तदानाचे महत्त्व सांगितले . सहयोगी कर्मचारी आणि रक्षा टीमसह सर्व जीएसआर कर्मचाऱ्यांकडून ६५ युनिट रक्त संकलन करण्यात आले.
शिबिरात प्रमुख मान्यवरांचे हस्ते सर्व रक्तदात्यांना सहभागाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

Previous article*कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरोरावासियांचे सहकार्य आवश्यक* – *आयुष नोपाणी*
Next article*विविध सामाजिक संघटनेतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती सोत्साह साजरी*