Home चंद्रपूर  *कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरोरावासियांचे सहकार्य आवश्यक* – *आयुष...

*कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरोरावासियांचे सहकार्य आवश्यक* – *आयुष नोपाणी*

65
*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : तालुक्यातील जनता शातंताप्रिय असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण राज्याच्या तुलनेत कमी असून कायदा व सुव्यवस्थेचे आशादायी चित्र निर्माण होण्यासाठी नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नुकतेच रूजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी (आय.पी.एस ) यांनी येथे केले. आंनदवन मित्र मंडळ , ओशनिक बहुउद्देशीय संस्था वरोरा व नगर परिषद वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती, जेष्ठ नागरिक दिवस, जागतिक हृदय दिवस प्रित्यर्थ येथील नवीन नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित स्वागत, अभिनंदन, सत्कार व हृदयविकार तपासणी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक व आनंदम् चे महाराष्ट्र समन्वयक डॉ.वाय. एस.जाधव होते.
व्यासपीठावर तहसीलदार रोशन मकवाने, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण आदित्य जीवने, उपजिल्हा रुग्णालयाच्या चीफ नर्सिंग ऑफीसर वंदना बरडे, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, सदस्य लक्ष्मणराव पराते, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगर परिषदेचे मुख्य अभियंता शशिकांत दलाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा ममता बाहुरे उपस्थित होते.
नोपाणी पुढे म्हणाले की, तालुक्यात रूजू झाल्यापासून स्वंयसेवी संस्था, नागरिकांकडून होत असलेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. कार्यक्रमात केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण वरोरा सुपुत्र आदित्य जीवने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांकडून मला भरभरुन प्रेम मिळाले, मी त्याचा सदैव ऋणी राहीन. वंदना बरडे यांनी ह्रदय रोगापासून बचावासाठी संतुलित आहार, नियमितपणे व्यायाम व चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. यावेळी तहसीलदार मकवाने, लक्ष्मण पराते यांची समायोचित भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात डॉ. जाधव यांनी आनंदवन मित्र मंडळ व ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या अपेक्षारहित कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आयोजित हृदयरोग निदान कार्यक्रमात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बीपी ,शुगर चाचणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरुपात ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे , सदस्य लक्ष्मणराव पराते यांचा सत्कार करण्यात आला.
प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्याने सभागृहात चैतन्यमय वातावरण पसरले होते. पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील एनसीडीच्या समुपदेशक नेहा इंदूरकर, तणिष्का खडसाने, किरण धांडे, न.प.चे कर निरीक्षक राजू खिरटकर, वसंत उमरे, नंदकिशोर पाचभाई, जयंत कांबळे, त्रिश्याम बोस, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री माजी प्राचार्य बी.आर. शेलवटकर, राहुल देवडे, बंडू देऊलकर, शाहीद अख्तर, प्रवीण गंधारे, ओंकेश्वर टिपले, संजय गांधी, शरद नन्नावरे, संजय जावडे, ममता खैरै, संगीता गोल्हर, भास्कर गोल्हर, राजेश ताजने, तुषार मर्दाने आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी व सुजाण नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous article*संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावरहित जीवन ही निरोगी हृदयाची त्रिसूत्री* – *डॉ. प्रतीक दारुंडे*
Next article*जीएमआर तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*