Home चंद्रपूर  *आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी*

*आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी*

76
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा*: आदिवासी क्रांतिचे अग्रदूत, स्वातंत्र्य सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने कार्यालयाच्या दालनात ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून सोत्साह साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांनी भूषविले. यावेळी समाज कार्यकर्ता तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने, सहा. अधिसेविका वंदना बरडे, सहा.अधीक्षक गणेश तुमराम, परिसेविका इंदिरा कोडापे, सुनंदा पुसनाके, समुपदेशक गोविंद कुंभारे, पत्रकार प्रवीण गंधारे प्रामुख्याने उपस्थित होते.
राजेंद्र मर्दाने म्हणाले की, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी अन्याय अत्याचारात खितपत पडलेल्या आदिवासी समाजाला योग्य दिशा दाखवून सर्वसामान्यांना अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी समाजाला ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क्रांतीची बिजे रोवली. आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा मुंडा यांची ओळख आहे. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राठोड म्हणाले की, १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा यांनी समाजबांधवांना तसेच देशवासियांना गुलामगिरीची जाणीव करून देत इंग्रज सरकारविरूद्ध विद्रोहाचे रणशिंग फुंकले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींच्या बहुमूल्य योगदानाचे श्रेय जननायक बिरसा मुंडा यानांच जाते.
याप्रसंगी वंदना बरडे यांनीही बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सुरूवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तुमराम यांनी केले. आभार इंदिरा कोडापे यांनी मानले.
याप्रसंगी ओंकार मडावी, श्वेता लोखंडे, शिवानंद पाटील, ताराबाई त्रिवेदी, निरंजना कोरडे, शरद घोटेकर, निशानकर आदींसह बहुसंख्येने कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Previous articleउदीयमान सूर्य को दिया अ‌र्घ्य।।
Next article*शीतलची आत्महत्या नव्हे, संजीवन समाधी* – *डॉ. विकास आमटे*