Home चंद्रपूर  भद्रावतीत आशा व गट प्रवर्तक संघटनेचा मेळावा संपन्न.

भद्रावतीत आशा व गट प्रवर्तक संघटनेचा मेळावा संपन्न.

87
*  कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा – कॉ गैनवार
* 31 जुलै रोजी होणार संघटनेचा चंद्रपुरात जिल्हा अधिवेशन.सहभागी होण्याचे आयटक चे आवाहन.
भद्रावती :–आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेचा तालुका स्तरीय मेळावा स्थानिक हुतात्मा स्मारक नगर परिषद सभागृहातकॉ विनोद झोडगे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली तर कॉ राजू गैनवार यांच्या अध्यक्षतेखाली दि 17 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी तालुका सचिव वंदना बडवाईक,अधक्ष सुचित्रा काळे ,मनीषा भोयर ,सुनीता चिकटे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात परंतु त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुधा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात .आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आशा वर्कर कडून सातत्याने सुरळीतपणे निभवली जात असतांना सुद्धा ,आरोग्य संचालकांनी 24 जून 2022 रोजी एक आदेश काढून कामात हयगय करणाऱ्या आशा वर्कर ला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे अत्यंत चुकीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आशा वर्कर वर अन्याय होणार आहे तेव्हा वरील आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा आयटक च्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देत आशा वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संघटनेचे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांनी स्थानिक मेळाव्यात घेतली तसेच आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा अधिवेशन 31जुलै रोजी चंद्रपुर येथे आयोजित केले असून या मध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तर आपल्या अधक्षीय भाषणात कॉ राजू गैनवार यांनी सांगितले की प्रचंड वाढलेल्या महागाईत अगदी तुटपुंज्या मानधनात आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जगावे कसे असा सवाल करीत त्यांना किमान वेतन लागू करण्याची मागणी केली.
सदर मेळाव्यात आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या ज्या मध्ये आरोग्य वर्धिनी अनंतर्गत इंसेंटिव्ह फार्म चे मासिक मिळणारे 1000 रुपये मागील एप्रिल 2021 पासून थकीत आहेत ते त्वरित देण्यात यावे,वाढीव मानधन गेल्या 4महिन्या पासून थकीत आहे,राज्य सरकार द्वारे मासिक 500 रु कोरोना प्रोत्साहन भत्ता जुलै 2021 पासून थकीत आहे ,दर महिन्याला वेतन चिट्टी देण्यात यावे, मे 2020 पासून ग्राम पंचायत स्तरावरून देण्यात येणारा कोरोना प्रोत्साहन भत्ता थकीत आहे ते तातडीने देण्यात यावा.आशा व गट प्रवर्तक महिलांना किमान 24 हजार वेतन,शासकीय दर्जा,सामाजिक सुरक्षा,म्हातारपणी पेन्शन,आदी मागण्या विषही चर्चा करून पुढील लढा तीव्र करणार असल्याचा निर्णय आशा व गट प्रवर्तक महिलांनी घेतला व पुढील 3 वर्षा साठी 15 महिला कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून अधक्ष म्हणून सुचित्रा काळे तर सचिव वंदना बडवाईक,कार्याध्यक्ष ज्योती खामनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मेळाव्याचे संचालन वंदना बडवाईक तर आभार सुचित्रा काळे यांनी मानले.यावेळी तालुक्यातील शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होते.
Previous article*कृषि दिनानिमित्त वृक्षारोपण व संवर्धन मोहिम*
Next article*वरोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना जीएमआर वरोरा तर्फे मदतीचा हात*