Home चंद्रपूर  *कृषि दिनानिमित्त वृक्षारोपण व संवर्धन मोहिम*

*कृषि दिनानिमित्त वृक्षारोपण व संवर्धन मोहिम*

65
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : महाराष्ट्रातील हरितक्रांतीच जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संलग्नित कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर मुल-मारोडाच्या विद्यार्थ्यांकडून वरोरा तालुक्यातील चिनोरा या गावी ‘ वृक्षारोपण आणि संवर्धन ‘ मोहिम राबविण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय कृषि पुरस्कार विजेते भानुदास बोधने, कृषि अधिकारी विजय काळे, चिनोरा गावाच्या सरपंच ताई परचाके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना बोलने म्हणाले की, ‘शेतीतील पिक वाढवायचे असेल तर आधुनिक पद्धतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. याप्रसंगी गावातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. गावातील ५० पेक्षा अधिक गावकऱ्यांनी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. अंशुल सद्दभैय्ये यांनी कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन केले.
Previous article*वरोरा विद्युत वितरणचे सहायक अभियंता चुक्का एसीबीच्या जाळ्यात*
Next articleभद्रावतीत आशा व गट प्रवर्तक संघटनेचा मेळावा संपन्न.