Home चंद्रपूर  जीएमआर वरोरा एनर्जी लि. ” राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण – २०२३ ” पुरस्काराने...

जीएमआर वरोरा एनर्जी लि. ” राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण – २०२३ ” पुरस्काराने सन्मानित

55

*महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण २०२३ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित केले आहे. १०० मेगावॉट पेक्षा जास्त विद्युत निर्मिती करणाऱ्या पॉवर प्लांट गटात ऊर्जेच्या विविध कुशल उपायांचा विवेकपूर्ण वापरासाठी हा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी द्वारे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवनात नुकत्याच आयोजित कार्यक्रमात महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडचे सीईओ आशिष बसू व सीओओ (थर्मल) धनंजय देशपांडे यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी देशभरातील वेगवेगळ्या सेक्टरच्या १०२ पॉवर कंपनीने भाग घेतला. विशेष म्हणजे जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड (जीडब्ल्यूईएल), जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ( जीपीयुआयएल) चा एक भाग असलेल्या विद्युत निर्मिती क्षेत्रातील कंपनीने हा पुरस्कार पटकावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना एनर्जी अँड इंटर नेशनल एअपोर्ट्स जीएमआर ग्रुपचे बिझनेस चेअरमन श्रीनिवास बोम्मिडाला म्हणाले की, भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळालेला हा प्रतिष्ठित पुरस्कार आम्हाला उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यास नेहमी प्रोत्साहन देईल. हा पुरस्कार अद्यावत तंत्रज्ञानाच्या अवलंब करण्याच्या आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो ज्यामुळे आम्हाला आमची ईएसजी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होते, जीएमआर समूहाचा दृष्टीकोन समाजात तसेच औद्योगिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवीत आहे , असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना, जीपीयूआयएलचे सीईओ (ऊर्जा) आशिस बसू म्हणाले की, जीएमआरच्या उर्जा संरक्षणच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील एकूण १०२ पॉवर प्लांट सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त ४ पॉवर प्लांट्सना या पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले होते. त्यात जीडब्ल्यूईएलला प्रथम विजेते म्हणून घोषित करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, जीडब्ल्यूईएलचा ऊर्जा संवर्धनाचा प्रवास २०१५ पासून सुरू झाला तेव्हापासून नवनवीन उपक्रम द्वारे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. सन २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत ७.७६ कोटी युनिट विद्युत उर्जेची आणि २.९४ लाख मॅट्रिक कॅलरी थर्मल एनर्जीची बचत झाली आहे. जीएमआर वरोरा एनर्जी लि. ने महाराष्ट्रातील वरोरा ( चंद्रपूर जिल्हा ) येथे ६०० मेगावॉट (२ X ३०० मेगावॉट ) कार्यरत कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाचा उभारलेला आहे. या व्यतिरिक्त जीएमआर कडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड सोबत २०० एम डब्ल्यू साठी दीर्घकालीन पीपीए, तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन सोबत१५० मेगावॉटचा पीपीए आहे. सोबत अलीकडेच हरियाणा डिस्कॉम्सला वीज पुरवठा करण्यासाठी १५० मेगावॉट पीपीए साठी बोली जिंकली आहे. एप्रिल २०२४ पासून पुढील पाच वर्षे हरियाणा सरकारला वीज पुरवठा करणार आहे. जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त होने ही जीएमआर ग्रुपच्या सततच्या प्रयत्नांची साथ आहे, असे त्यांनी सांगितले.

Previous articleवरोरा भद्रावती चन्द्रपुर रेलवे यात्री संघ ने दिया ज्ञापन.
Next articleपटाला-रालेगांव घाट से हो रही रेत चोरी