Home बड़ी खबरें विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी-पालकमंत्री दादाजी भुसे

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी-पालकमंत्री दादाजी भुसे

69

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये

जखमींना एक लाख रुपयांची मदत

घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल

 

विरार (जि.पालघर) येथील विजय वल्लभ रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विरार येथील विजय वल्लभ आयसीयू कक्षाला रात्री 3:30 च्या सुमारास आग लागली पालकमंत्री श्री.भुसे यांनी आज तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

घटना अत्यंत दुर्दैवी असून चौकशीअखेर दोषी पात्र व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 

Previous articleमहाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई- पासची तरतूद
Next articleभाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप