Home चंद्रपूर  *पोहे ग्रामवासीयांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ*

*पोहे ग्रामवासीयांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ*

71
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* समाजातील सर्व घटकांना मध्ये सुदृढ आरोग्य विषयी जागृती यावी व कावीळ, एचआयवी / एड्स, कॅन्सर, टी. बी. बाबत माहिती व्हावी याकरिता एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा , टाटा मेमोरियल ट्रस्ट ( टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम ), व अंबुजा फाउंडेशनच्या वतीने वरोरा तालुक्यातील पोहे येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन पोहे ग्रामचे सरपंच माया झाडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ निखिल लांबट, समुपदेशक गोविंद कुंभारे, डॉ.तुषार रामटेके, श्री सुरज साळुंके, शेगांवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चौधरी उपस्थित होते.
डॉ. लांबट यांनी डोळ्याचे महत्व त्यांची निगा व आजार यावर सविस्तर माहिती दिली, डॉ रामटेके यांनी मुखाच्या कर्करोगाची करणे, प्रकार व उपचार यावर मार्गदर्शन केले. साळुंके यांनी स्त्री मधील आजार, स्तनाचा कर्करोग, पोटातील विकार, कावीळ विषयी माहिती दिली .
गोविंद कुंभारे यांनी एच आय वी/ एड्स, की.बी रोगाबाबतची माहिती दिली व तपासणी करण्याचे आवाहन केले.
शिबिरात कावीळ, एचआयवी, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब आदी तपासणी करण्यात आली.
शिबिर यशस्वीतेसाठी एएनएम उषा मडावी, विपुल देवगिकर, शुभम भुते, अरविद झाडे, साक्षी जगताप ,राखी ढोबले, अजय येरने, पिंटू मुसरे, अदिती निमसरकार, दिव्या पारशिवे , ग्राम पंचायत सदस्य अमोल सवसागड़े, सखूबाई चौधरी, पोलीस पाटील चन्द्रशेखर टापरे गुरुदेव मंडळ अध्यक्ष अरविंद झाडे, सचिन निमकर आशा वर्कर नीला उरकंडे आंगनवाडी सेविका कल्पना थुलकर यांनी योगदान दिले.
सूत्रसंचालन उपसरपंच सुनील रोडे यांनी केले तर आभार प्रणाली सोनटक्के यांनी मानले.
Previous article*श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोऱ्याचेचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न*
Next articleकृषीच्या विद्यार्थ्यांने केले किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन.