Home चंद्रपूर  *श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोऱ्याचेचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न*

*श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोऱ्याचेचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न*

102
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोऱ्याचे वतीने स्थानीक गुरूदेव सेवा आश्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांचे हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली हे होते.
शिबिरात अ.भा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, न. प. चे माजी सभापती छोटुभाई शेख, डॉ शेन्डे, जीवन प्रचारक चंदनलालजी शर्मा, लक्ष्मण कातोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात डॉ. राठोड म्हणाले की, कोरोना काळात रक्ताची गरज ओळखून आयोजकांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.
गमे म्हणाले की, कोरोना संक्रमणाचा दर जरी घटलेला दिसत असला तरी गुरुकुंज आश्रम मोझरीच्या सुचनेनुसार यावर्षी सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साधे पद्धतीने साजरी होत असल्याने उपासकांनी मोझरी न येता गावी आपापल्या मंडळातील साजरी करावी, असे निश्र्चित करून या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे कळविण्यात आल्याने वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अली म्हणाले की, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. आयोजकांनी स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून अली यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
सुरूवातीला दीपप्रज्वलन व संकल्प गीताने शिबिराची सुरुवात झाली.
शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टर व त्यांची चमु संजय गावीत, उत्तम सावंत, रोशन भोयर, मनोज घोळके, चेतन वैरागडे यांनी रक्तदानाची व्यवस्था केली.
कार्यक्रमानिमित्त स्व. सुहासिनी पहापळे स्मृती प्रित्यर्थ मुंबई येथील जयंतराव पहापळे यांच्या तर्फे रक्तदाता तथा मान्यवरांना ग्रामगीता भेट देण्यात आली. तसेच ५०० ग्रामगीता जनतेला भेट स्वरुपात पोहचविण्यात आल्या.
शिबिराचे यशस्वीतेसाठी सर्वश्री नंदकिशोर खिरटकर, अविनाश पिंपळकर, मनोहर पारोधे, अशोक वैद्य, चंद्रशेखर कानकाटे, अशोक ठेंगे, धनंजय कोहाडे, झुरपुडे, कादर शेख, पुंडलीक कवरासे, दानविर वैरागी, आंबोरकर, आदींसह गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व उपासकांनी अथक परीश्रम घेतले.
सुत्रसंचालन श्री गुरुदेव सेवा मंडळाचेचंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे यांनी केले. आभार अशोक ठेंगे यांनी मानले.
Previous article*नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते ई-कचरा संकलन केंद्राचे उदघाटन*
Next article*पोहे ग्रामवासीयांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ*