Home बड़ी खबरें *नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते ई-कचरा संकलन केंद्राचे उदघाटन*

*नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते ई-कचरा संकलन केंद्राचे उदघाटन*

80
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* :- आंतरराष्ट्रीय ई- कचरा दिनाचे औचित्य साधून आनंद निकेतन महाविद्यालय अंतर्गत पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा समिती, नगर परिषद वरोरा व सुरिटेक प्रा.लि. बुटीबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन महाविद्यालयात स्थापित ई – कचरा केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते.
कार्यक्रमात डॉ. संयोगिता वर्मा, प्रा. मनोहर चौधरी, प्रशांत वाघ उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात नगराध्यक्ष अली म्हणाले की, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा म्हणजे इ कचरा. ई कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास त्यामधून पर्यावरण, मानवी आरोग्यावर आणि प्राण्यावर वाईट परिणाम होतात. आपण निर्माण करणाऱ्या कचऱ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जनजागृती, राजकीय इच्छाशक्ती व प्रत्येक नागरिकालचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत विचार न केल्यास ते भविष्यात मोठा धोका बनू शकते, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. काळे म्हणाले की, आजचा परिस्थितीत आधुनिक उपकरण वापरने ही लोकांचे स्टेटस बनलेआहे, अशा परिस्थितीत आपल्या घरी, परिसरात खराब असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांना योग्य प्रकारे डिस्पोज न केल्यास त्याचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यासाठी इ कचरा एकत्रित करणे गरजेचे आहे. याची दखल घेत आनंद निकेतन महाविद्यालयात ई-कचरा संकलन केंद्र बनविण्यात आले आहे.
उपप्राचार्य राधा सवाने यांनी आपल्या घरी जमा होणाऱ्या ई-कचरा याचे व्यवस्थापन कसे करायचे यावर मार्गदर्शन करून या समस्याचे समाधान या केंद्रावर होणारे अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशांत वाघ यांनी केले. याप्रसंगी आयोजन समितीचे सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Previous article*अवैध वाळू तस्करी प्रकरणात ४ ट्रकसह ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० आरोपींवर गुन्हा दाखल*
Next article*श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोऱ्याचेचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न*