Home बड़ी खबरें ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

107

सारथी फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत नाशिक येथे महारक्तदान  शिबीर संपन्न

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक (सिडको):
राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन सारथी फाउंडेशन स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, शाहू नगर मित्र मंडळ, शिवबा फ्रेन्ड सर्कल,कोरोना योद्धा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच कोरोनाची नाजूक परिस्थिती असताना जून महिन्यात देखील रक्तदान शिबीर या मंडळाने राबवले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मंडळाने दोनदा रक्तदान शिबीर राबवल्याचे सारथी फाउंडेशन अध्यक्ष तन्मय गांगुर्डे पाटील यांनी बोलताना दिली.
विशेष म्हणजे या शिबिरात जमा झालेल्या रक्तसाठ्याचा काही भाग अर्पण ब्लड रक्तपेठी अल्झायमस रुग्णांना देणार आहे. सारथी फाउंडेशन ने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिरात अनेक मंडळांचे युवक सामील झाले होते. त्यातील भरपूर युवकांनी रक्तदान केले. काही रक्तदाते काही कारणास्तव रक्तदान करू शकले नाही. या रक्तदात्यांना मंडळातर्फे भेटवस्तू स्वरूपात ज्युस/बिस्कीट देण्यात आले. हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम युवा नेते तन्मय गांगुर्डे, प्रतीक बैरागी यांनी आयोजित केला आला असून यंदाचे ३ वे वर्ष होते असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने तरुणाईचा उत्साह पाहण्यास मिळाला असल्याचे देखील पुढे बैरागी यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी अर्पण रक्त पिढीचे डॉ.लक्ष्मी राणे,सरला गोवर्धने,आरती शिरसाठ आधीनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जितेंद्र पाटील, समाधान साळुंखे, किशन बैरागी, साहिल हेडेकर, घनश्याम बैरागी, ऋषिकेश सोनास, हरीश झोटिंग, शुभम बोरकडे, प्रणव उगलमुगले, देवेंद्र निकम प्रतीक आहेर गोपाळ शिरोडे इ चे अनमोल सहकार्य लाभले.