*आनंदम् मैत्री संघा तर्फे आनंदवन परिसरात वृक्षारोपण* 

*राजेंद्र मर्दाने*

वरोरा*  :-  गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आनंदम् मैत्री संघ, शाखा वरोरा यांच्या वतीने आनंदम् चे संस्थापक स्वामी आलोक यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आनंदवनातील आनंद विहार परिसरात ध्यान व वृक्षारोपण करून गुरू पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.      यावेळी आनंदम् चे महाराष्ट्र समन्वयक संगीता गोल्हर, वरोरा समन्वयक सचिन जाधव, नीता गोगटे, स्नेहा देशमुख, डॉ. प्रवीण मुधोळकर प्रामुख्याने उपस्थित होते.सुरवातीला साधकांनी भगवान ओशो व आनंदम् चे संस्थापक स्वामी आलोक शर्मा  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर ध्यान करण्यात आले. स्वामी आलोक यांनी वृक्षाचे पर्यावरणातील महत्व व वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित करीत प्राण वायू देणाऱ्या रोपांची लागवड  करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार परिसरात वड, कडूलिंब, तुळसी, पिंपळ  आदी रोपांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमात आनंदम् चे सदस्य लिला जाधव, विद्या जाधव, मनिषा बुधे, संध्या माटे, कुंदा डुकरे, वर्षा चवले, रेणुका उपाध्ये, रेखा बांगडे, सेजल डाखरे, भास्कर गोल्हर, प्रशांत देशमुख, दादाराव दडमल, राजू बांगडे, अशोक रोकडे, बारहाते, शुभम पाचभाई, मंयक जाधव, श्लोक उपाध्ये, रिधी डाखरे, योगेश्वरी उपाध्ये, स्नेहा बांगडे आसावरी उपाध्ये, साई चवले, प्रांजल गायकवाड, राजेंद्र मर्दाने इ. उपस्थित होते.

Previous articleवरोरा -भद्रावती – चंद्रपूर रेलवे प्रवासी संघ ने रेलमंत्री को भेजा पत्र.
Next article*समाजातील सिकलसेल वाहक – पिडीत व्यक्तींनी एकमेकांशी विवाह करु नये *डॉ. प्रफुल खुजे*