Home चंद्रपूर  *पारंपारीक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या फायद्याची*- डॉ. मनोज जोगी*

*पारंपारीक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या फायद्याची*- डॉ. मनोज जोगी*

211

 

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : शेतीमधील पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी प्रगत होणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवन कृषी महाविद्यालयाचे वनस्पती व रोगशास्त्राचे सहा. प्राध्यापक तथा रोटरी क्लबचे माजी अध्यक्षडॉ. मनोज जोगी यांनी केले. रोटरी क्लब वरोरा व कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम आबमक्ता येथे नुकतेच शेतकरी जागृत मार्गदर्शन शिबीराचे आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे हे होते. मंचावर रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष हिरालाल बघेले, रोटरी क्लबचे सचिव बंडू देऊळकर, कृषी मंडळ अधिकारी किशोर डोंगरकर, कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ बालाजी धोबे, रोटेरियन मधुकर फुलझेले, आबामक्ताचे उपसरपंच पितांबर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
जोगी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी नकारात्मक विचारांचा त्याग करून प्रयोगशील वृत्तीचा अंगिकार करावा. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
किशोर डोंगरकर यांनी सध्या परीस्थितीत पिकांची काळजी व शेती नियोजनाबद्दल माहिती दिली.
बालाजी धोबे यांनी शेतमालाला योग्य भाव कसा मिळवता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात यशवंत सायरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगून कृषी विस्तारात शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्त्व विशद केले.
जनजागृती शिबिरात रोटरी अध्यक्ष बघेले, उपसरपंच मेश्राम आदींची समायोचित भाषणे झाली.
यावेळी रोटेरियन सर्वश्री विनोद नंदुरकर, विजय पावडे, सचिन जीवतोडे, रवि शिंदे यांच्यासह गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शेतकरी मुकेश माथनकर यांनी केले. आभार नितीन टोंगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी व रोटरी क्लब सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती रोटरी क्लबचे सचिव बंडू देऊळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Previous article*पत्रकार प्रवीण गंधारे यांना मातृशोक*
Next articleशांतता समितीची बैठक संपन्न।।