Home चंद्रपूर  *पत्रकार प्रवीण गंधारे यांना मातृशोक*

*पत्रकार प्रवीण गंधारे यांना मातृशोक*

187

 

*वरोरा* : तुळाणा येथील मुळ रहिवासी अनुसया नागोराव गंधारे ( वय ७६ वर्षे ) यांचे आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता खांजी वार्डातील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी सचिव , दैनिक नवभारतचे वरोरा प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गंधारे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती नागोराव झिबलाजी गंधारे,५ मुलं अमित गंधारे, मुकेश गंधारे, प्रवीण गंधारे, अनिल गंधारे, सुनील गंधारे, मोठी मुलगी सौ.अनिता शंकर पुप्पलवार, जावई ४ सुना व ५ नातवंड असा परिवार आहे.
आज सायंकाळी ७.०० वाजता मालवीय वार्डातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous articleदेशी पिस्तौल के साथ दो गिरफ्तार.
Next article*पारंपारीक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या फायद्याची*- डॉ. मनोज जोगी*