Home चंद्रपूर  भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे भद्रावतीत रास्ता रोको...

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे भद्रावतीत रास्ता रोको आंदोलन.

96

भद्रावती- येथील दिनांक 27/09/2021 ला मोदी सरकारच्या विरोधी कार्पोरेट धार्जिन्य व देशविकाऊ धोरणा विरुद्ध संपूर्ण देशभर ” भारत बंद” आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे पुकारण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून नागपूर – चंद्रपूर हायवे रोड टप्पा चौक भद्रावती येथे दुपारी 12 : 00 वाजता ” रास्ता रोको” आंदोलन कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे व ” रास्ता रोको ” आंदोलन करून तहसील कार्यालय येथे मागण्याचे निवेदन देण्यात येईल.गेल्या 9 महिन्यापासून शेतकरी विरोधातील तीन काळे कायद्ये रद्द करा या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे परंतु केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही . या आंदोलनात सहभाग होण्याचे आवाहन कॉ. डी एच उपासे कामगार नेते,कॉ.येस के.इटनकर कामगार नेते, कॉ. ये के कॅप्टन वेकोली कामगार नेते, कॉ.दिलीप वनकर वेकोली कामगार नेते, कॉ. शेख शकील किसान नेते,कॉ,.सागर भेले युवा नेते, कॉ. सीमा पवार माजी नगरसेविका व महिला नेत्या, कॉ. बेबी कुळमेथे महिला नेत्या इत्यादींनी केले आहे

Previous article*तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या सवयींनी अकाली मृत्यूचा धोका*- *डॉ. राहुल पिंपळकर*
Next article*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदित्य जीवनेच्या चमकदार कामगरीने वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*