*राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत वरोरा उपजिल्हा रुग्णालयही पुरस्कृत*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात राष्ट्रीय कुटुंब कल्याण पुरस्कार कार्यक्रम,फ्लोरेन्स नाईटिंगल गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील अधिसेविका वंदना बरडे यांना फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्काराने गौरविण्यात आले.
मंचावर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विवेक जान्सन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार , डॉ. प्राची नेहुलकर, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या मेघा कुळसंगे आदी उपस्थित होते.,
कार्यक्रमात जिल्हास्तरावर वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील अधिसेविका वंदना बरडे यांनी अधिसेविका म्हणून उल्लेखनीय योगदान प्रदान केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचा फ्लोरेन्स नाईटिंगल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक जान्सन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ८ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सोबत उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांना राष्ट्रीय कूटुंब कल्याण कार्यक्रम विशेष योगदानाबद्दल जिल्ह्यातून ३ क्रमांकचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग ऑफिसर रूबिना खान यांना रुग्णसेवेसाठी फ्लोरेन्स नाईटिंगेल व कुटुंब कल्याण अंतर्गत तांबी नियंत्रन कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. अंकुश राठोड यांच्या नेतृत्वाखाली वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील टीम आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यामुळे विविध पुरस्कारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जिल्हा स्तरावर सन्मानितांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.